नागपंचमी व 'बारी ' लोकसंगीत

                  बारी हो पण ही बारी नगदेवला प्रसान करण्यासाठीची फडाची नव्हे😁. नागपंचमी निमित्त नागदेवाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक ' बारी ' लोक संगीत सादर करताना गावची मंडळी😍# ही परंपरा जोपासणाऱ्या सर्व वैदांचे व गावकऱ्यांचे अभिनंदन😊 हे एक लोक संगीत आहे , जे मराठवाडा व विदर्भाच्या सीमाभागात जालना,बुलढाणा,हिंगोली, परभणी च्या भोकरदन, जाफराबाद, मंठा, लोणार, सिंदखेडाजा, जिंतूर ह्या भागातील खेड्यापाड्यात , वाडी  वस्तीवर ( मला जेवढे माहीत आहे तेवढे गाव )फार पूर्वीपासून नागपंचमीच्या दिवशी  गावकरी मंडळी नागदेवला पुजण्यासाठी हे लोकसंगीत सादर करतात . गावातील पारावर एक नागाची प्रतिमा जिला "पाटी" असे म्हणतात ती ठेवली जाते व त्यासमोर हे लोकसंगीत सादर केले जाते. गावातील सर्व लोक ते ऐकण्यासाठी येतात. ह्या मध्ये एक विशेष असे वाद्य, जे एका पितळाचे भांड व त्यावर परात ठेवून ,कड्याद्वारे वाजवले जाते , ह्या वाद्याला देवप्रमाने पुजले जाते, यामधे इतर वाद्य जसे चिपळ्या,ढोलकी ,झांज इत्यादी ची मदत घेतली जाते आणि बोलीभाषेतील गीत जे नागाला समर्पित असतात ते सादर केले जातात , काही प्रमाण भाषेतील मराठी v हिंदी गणाच्या चालीवर म्हणले जातात ,जे ऐकण्यासाठी खूप छान वाटतात . 

                  15 20 वर्षापूर्वी ह्या लोकसंगीताचा मैफिली भरवल्या जात व उत्कृष्ठ बारी सादर करणाऱ्या गावाला पुरस्कार दिला जाई; पण हल्ली तसे होताना कुठे दिसत नाही ,पर्यायाने हे लोकसंगीत विसरले जाते की काय ह्याची भीती निर्माण झाली आहे . पण आमच्या गावात नागपंचमी च्या दिवशी आजही हे लोकसंगीत तेवढ्याच उत्साहाने सादर केले जाते हे बघून फार आनंद वाटला. ही परंपरा अशीच एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहो, कारण याचे कुठेही लिखाण होत नाही , हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अलिखित दिले जाते . ह्या लोकसंगीताचा एक विशेष की हे सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येवून सादर केले जाते, सामाजिक एकता ह्यातून टिकून राहते हे बघायवास मिळते.हे लोकसंगीत जिवंत ठेवणारे आमचे गावकरी (माळ सावंगी व खोराड सावंगी), जे मुंबई, पुणे व इतर ठिकाणी कामाला असताना सुद्धा वेळात वेळ काढून गावी येतात त्यांचे खुप खूप अभिनंदन व शुभेच्छा, आजच हे सादरीकरण बघून मनोंमन आनंद झाला, गावकरी परंपरा जिवंत ठेवतायेत ह्याचा खोराड सावंगीकर म्हणून अभिमान वाटतो आजच्या सादरीकरणाची चित्रफीत ह्या लेखासोबत जोडली आहे, नक्की बघा 😊नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐


लेखन:- महेश प्रसाद ठोकरे, खोराड सावंगी, ता. मंठा, जि. जालना

Comments

Popular posts from this blog

Best Smartwatches in India (March 2023)

OnePlus Nord CE 3 Lite 5G launch in India